मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व || दत्त जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा) || श्रीदत्ताचे पोथीचे पारायण || श्री गुरुचरित्राचे पारायण कसे करावे? || गुरुचरित्र वाचण्याचे नियम || गीता जयंती (मार्गशीर्ष शुद्ध एकादशी)

दत्त जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा)

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर बुधवारी सायंकाळी अत्री ऋषींची पत्नी अनुसूया प्रसूत झाली. अत्री ऋषीनी आपल्या घरी विष्णू जन्माला आला असे समजून त्याची अनुसूया केले आणि त्याचे नाव ‘दत्तात्रेय’ असे ठेवले. या दिवशी दत्ताच्या देवळात दनामकरण साजरी केली जाते. या दिवशी ‘गुरुचरित्राचे’ पारायण दत्तात्रयाचे कीर्तन इ. कार्यक्रम यतीत जातात. ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसेल त्यांनी सात दिवस गुरुदत्तात्रेयांचा नामस्मरणाचा जप केला तरी चालतो. या दिवशी बऱ्याच जणांकडे ‘दत्तात्रेय नवरात्र’ असते ते नऊ दिवस आधी सुरू होऊन दत्तजयंतीला त्याची सांगता होते.

श्रीदत्ताचे पोथीचे पारायण

गुरुचरित्राचे पारायण हे सात किंवा तीन दिवसांचे केले जाते.

श्री गुरुचरित्राचे पारायण कसे करावे?

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला.

हा ग्रंथ प्रासादिक असून संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचण्याची परंपरा आहे. त्यामुळे गुरुचरित्राचे वाचन व पारायण व्हावे असं गुरुचरित्रकार म्हणतात, पारायण म्हणजे संकल्प करून ठराविक दिवसात काही नियमांचे पालन करणे होय, गुरुचरित्राचे तीन दिवस किंवा सात दिवसांचे पारायण करतात, गुरुचरित्रात एकूण ५३ अध्याय आहेत.

सात दिवसात पारायण करायचे असल्यास पहिला दिवस १ ते ९ अध्याय वाचावे, दुसरा दिवस १० ते २१ अध्याय वाचावे, तिसरा दिवस २२ ते २९ अध्याय वाचावे. चौथा दिवस ३० ते ३५ अध्याय वाचावे. पाचवा दिवस ३६ ते ३८ अध्याय वाचावे. सहावा दिवस ३९ ते ४३ अध्याय वाचावे. सातवा दिवस ४४ ते ५३ अध्याय वाचावे. जर तीन दिवसांत गुरुचरित्राचे ते ३७ अध्याय वाचावेत. तिसऱ्या दिवशी ३८ ते ५३ अध्याय वाचावेत. पारायण करायचे असल्यास पहिल्या दिवशी १ ते २४ अध्याय वाचावेत. दुसऱ्या दिवशी २५ भक्तिभावाने गुरुचरित्र मुहूर्त किंवा वार न बघता वाचले तरी चालू शकते.

गुरुचरित्र वाचण्याचे नियम

१. उत्चरित्र वाचण्याचे नियम स्थळ किंवा एक जागा पारायण पूर्ण होईस्तोवर निवडावी. त्यात कुठल्याही कारणाकरता बदल करू नये.

२. दत्त मूर्ती समोर पूर्वाभिमूख बसावे.

३. दत्तमूती नसल्यास पाटावर अक्षता ठेवून त्यावर दत्तमूर्ती म्हणून सुपारीची स्थापना करून महाराजांना आवाहन करावे.

४. आपण आसनावर बसावे व आपल्या उजव्या हाताला रिक्त आसन अंथरून ठेवावे.

५. सप्ताह वाचन करण्यापूर्वी विधिपूर्वक संकल्प सोडावा.

६. शुचिर्भूत होऊन वाचन सोवळ्यात करावे. वाचन करताना लय, शांत स्पष्ट उच्चार करावे. एकाग्र चित्त व भक्ती भावाने मन विचलित होऊ न देता वाचन करावे.

७. वाचन चालू असताना आसनावरून उठू नये कोणाशीही बोलू नये तशी कल्पना घरातील सगळ्यांना देऊन ठेवावी.

८. मीठ न घालता दहीभात किंवा तूप साखर पोळी खावी. तसेच ताक, दही आंबट खाऊ नये. कडधान्य खाऊ नये कांदा लसून खाऊ नये.

९. सात दिवस पहाटे काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती आणि रात्री शेजारती करावी.

१०. सप्ताह पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी सुपारीतून दत्तात्रयाचे विसर्जन करावे. नैवेद्य, आरती करावी. भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगावे नैवेद्याला घेवड्याची भाजी करावी.

गीता जयंती (मार्गशीर्ष शुद्ध एकादशी)

मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला ‘गीता जयंती’ साजरी केली जाते. खरं म्हणजे महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी आपण साजरी करतो; परंतु गीता हा असा एकच ग्रंथ आहे की त्याची आपण जयंती साजरी करतो. युद्धभूमीवर आपल्या समोर आपले शत्रू म्हणून आपलेच आप्त ज्या वेळेला अर्जुन बघतो. त्या वेळेला तो क्षात्रधर्म विसरतो आणि गलितगात्र झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने त्या वेळेस उपनिषदांचे जे सार सांगितले आहे तेच सार वेदव्यासांनी महाभारतामध्ये सातशे श्लोकांच्या रूपाने लिहून ठेवले आहे. ते सार म्हणजेच गीता हा पवित्र ग्रंथ होय. वरवर बघता ही गीता आपल्याला असे वाटते की फक्त कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आहे पण तसे नाही तर त्यातील प्रत्येक ओळ न ओळ सर्वसामान्य माणसांनी आपल्या जीवनात कसे वागावे कसे वागू नये, आप्तस्वकीयांशी कसे वागावे, क्षमा कशी करावी या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह गीतेमध्ये केलेला आहे. म्हणूनच ‘गीता’ ही हिंदूचा पवित्र ग्रंथ आहे. गीतेचा उपदेश हा अत्यंत साधा, सोपा असून आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना त्यानुसार आपण आचरण करू शकतो. मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गीता वाचली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे कारण त्याचे आत्मज्ञान करून मुक्त होणे हे मनुष्यजन्माचे अंतिम ध्येय होय. गीतेसारखे दुसरे शास्त्र नाही, गीतेसारखा दुसरा धर्म नाही आणि गीतेसारखी दुसरी माउली नाही.

Leave a Comment