बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये धावांचा डोंगर रचणारे हे 10 फलंदाज लिस्ट .

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी में रनों का पहाड़ लगाने वाले ये 10 बल्लेबाज की लिस्ट देखीय.

 

10.वीरेंद्र सेहवाग

भारताचा माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या 43 डावांमध्ये 1738 धावा केल्या आहेत.

9. स्टीव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या 35 डावांमध्ये आतापर्यंत 1887 धावा नोंदवल्या आहेत.

8. मॅथ्यू हेडन

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 35 डावांत 1888 धावा केल्या आहेत.

7. विराट कोहली

भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीनेही बीजीटीमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. विराटने या स्पर्धेत आतापर्यंत 42 डावात 1979 धावा केल्या आहेत.

6.चेतेश्वर पुजारा

टीम इंडियातून बाहेर असलेल्या चेतेश्वर पुजाराने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही खूप धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 43 डावात 2033 धावा आहेत.

5. मायकेल क्लार्क

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्कने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या 40 डावांमध्ये 2049 धावा केल्या आहेत.

4. राहुल द्रविड

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविडने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या 60 डावांमध्ये 2143 धावा केल्या आहेत.

3. व्हीव्हीएस लक्ष्मण

माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या 54 डावांमध्ये 2434 धावा केल्या आहेत.

2. रिकी पॉटिंग

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने BGT च्या 51 डावांमध्ये एकूण 2555 धावा केल्या आहेत

1. सचिन तेंडुलकर

भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. या स्पर्धेतील 65 डावांमध्ये त्याने 3262 धावा केल्या आहेत.

हे आहेत सर्वात जास्त run करणारे खेळाडू.

• सचिन तेंडुलकर विरुद्ध विराट कोहली: दोन्ही फलंदाजांचे बीजीटी रेकॉर्ड जाणून घ्या.

सचिन तेंडुलकरने 1996 ते 2013 या कालावधीत बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत भाग घेतला होता. जिथे त्याने एकूण 34 सामन्यात 65 डावात फलंदाजी केली आहे.

विराट कोहली 2011 पासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत आहे. जिथे त्याने टीम इंडियासाठी एकूण 24 सामन्यांमध्ये 42 डाव खेळले आहेत.

सचिन तेंडुलकरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 65 डावात 3262 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ५६.२४ इतकी आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने 42 डावात 1979 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ४८.२६ राहिली आहे.

सचिन तेंडुलकरने टीम इंडियाकडून खेळताना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण 9 शतके आणि 16 अर्धशतकं झळकावली आहेत.

Leave a Comment