महाराष्ट्राची राजधानी मुंबई. एकूण तहसील ३५६. राष्ट्रीय महामार्गाची लांबी २,९९० कि.मी. राज्य महामार्गाची लांबी ३०,५४८ कि.मी. रेल्वेमार्गाची लांबी ५,२९७ कि. मी. सागरी किनारा वर्धा, पेनगंगा व वेनगंगा या नद्यांची साथ अशी पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, बालाघाट महादेव व अजिंठा ह्या पर्वतरांगा आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे मुंबई, न्हावा-शेवा, मुरूड, दाभोळ, जयगड, रत्नागिरी व देवगड ही आहेत. त्याशिवाय अनेक छोटी बंदरे सुध्दा आहेत. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. इतर अनेक भाषा येथे बोलल्या जातात. प्रमुख विमानतळ पण आहेत. महाराष्ट्रात एकूण ७६८ किल्ले आहेत. किल्ल्यांनी समृध्द अशी भौगोलिक रचना महाराष्ट्राची आहे. अशा ह्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांची माहिती
मराठवाडा
१) औरंगाबाद जिल्हा हे शहर निजामशाहीचा पंतप्रधान मलिक अंबर याने सन १६१९ मध्ये उभारले. येथे पाणचक्की, बिबिका मकबरा, मराठवाडा विद्यापीठ, सोनेरी महाल, किलेअर्क, सिद्धार्थ उद्यान, खंडोबा मंदिर, जटवाड्याचे जैन मंदिर ही बघण्यासारखी स्थळे आहेत. विमानतळ चिखलदरा १० कि.मी. अंतरावर आहे. येथून बऱ्याच ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे तसेच बससेवा आहे.
२) अजंठा लेणी – सायगाव तालुक्यात ही जगप्रसिद्ध लेणी इसवीसन पूर्व २०० ते इसवीसन ६५० या विशाल काळात दगडात कोरलेली आहेत. औरंगाबादपासून ११० कि.मी. अंतरावर ही लेणी आहेत. जळगावपासून अंतर ६८ कि.मी. आहे. येथे २७ लेणी आहेत. या लेण्यातील क्र १,२,६,१६, १७, १८, ही प्रमुख लेणी आहेत. इ.स. १८११ मध्ये इंग्रजांना याचा शोध लागला. औरंगाबाद अजंठा रस्त्यावर एक फाटा व्ह्यू पॉईटकडे जातो. तेथून नालाकार पसरलेल्या सर्व लेण्या दिसतात. जवळच वाघोरा नंदी आहे.
३) आपेगाव- पैठण तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी हे गाव आहे. हे पैठणपासून १५ कि.मी. अंतरावर आहे. येथे संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला त्यामुळे या गावाला धार्मिक महत्व आहे.
४) खुदलताबाद – खुलताबाद म्हणजे स्वर्गाचे दार अशी कल्पना आहे. येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. येथे महंमद पैगंबराचा पोशाख व केस ठेवलेले आहेत. येथे भद्र मारूतीचे नवनिर्मित मंदिर आहे. मारूतीची मूर्ती लवंडलेल्या अवस्थेत आहे. हे स्थान स्वयंभू व जागृत आहे. येथे मलिक अंबरची कबर आहे.
५) कचनेर औरंगाबादपासून ३७ कि.मी. अंतरावर जैनांचे दक्षिणेतील महावीरजी समजले जाणारे श्री १००८ चिंतामण पार्श्वनाथ यांची भव्य मूर्ती असलेले मोठे मंदिर आहे.
६) दौलताबाद – याचे नाव देवगिरी. येथील प्रसिद्ध किल्ला यादवांनी बांधला. रामदेव रावांच्या काळात तो अल्लाउद्दीन खिलजीने सन १२९६ मध्ये जिंकला. किल्ल्याच्या भोवतीचा महाकोट, शिल्पसंग्रह, बुरूज, हाथी हौद, भारतमाता मंदिर, चांद मिनार, हेमाडपंथी मंदिर, कालकोटी चिनी महाल, मेढा तोफा, खंदक, भुयारी रस्ता, गणेश मंदिर, बारादरी, जनार्दन स्वार्मीच्या पादुका, दुर्गातोफ अशा कितीतरी गोष्टी बघण्यासारख्या आहेत. येथे यादवांनी बांधलेला शंभर फूट उंचीचा मनोरा चांदमिनार किल्ल्याजवळ आहे.
७) गौताळ – २८१ चौ. कि.मी. चे अभयारण्य येथे आहे. गौतम गुंफा व सीतानहानी यांसाठी हे स्थळ प्रसिद्ध आहे. ८) श्रीभंजन – येथे मार्कंडेय ऋषी, लोपामुद्रा व एकनाथ यांनी तपश्चर्या केली. ज्या शिळेवरती बसून एकनाथांनी तपश्चर्या केली व त्यांना दत्तदर्शन झाले तेथे दत्तमंदिर उभारले आहे. जवळच एक शिळा आहे तिच्यावरती आघात केल्यास आवाज येतो.
९) पितळखोरा – येथील १३ बौद्ध लेण्या सर्वात जुन्या लेण्या आहेत. त्यातील भिंतीवर रंगीत चित्रे आहेत.
पयांच्या हसमळ – हे थंड हवेचे ठिकाण ९१५ मीटर उंचीवर आहे. येथील गिरीजादेवी मंदिर व बालाजी मंदिर अझै दोन आहेत.
न देवळे करूळ इंग्रजांनी दिलेले नाव एलोरा आहे व त्याच नावाने हे जगभर प्रसिद्ध आहे. येथे जगप्रसिद्ध ३४ लेणी आहेत. १ ते १० बौद्धधर्माची, १३ ते २० हिंदूधर्माची व ३० ते ३४ जैन धर्माची आहेत. यातील १०, १४, १५, १६, २९, २९, ३२, ३३, व ३४ नंबरची लेणी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. क्रमांक १६ हे कैलास लेणे आहे. डोंगरात वरून सुरवात करून खालपर्यंत पुरे केलेले हे ह्या लेण्याचे शिल्पकलेचे हे वैशिष्ट्य आहे. याची लांबी १६४ फूट, रूंदी १०९ फूट व उंची ९६ फूट आहे हे खोदताना ३० लाख घनफूट दगड वेगळा करावा लागला. हे मंदिर बांधण्याचे काम तीन पिढ्यात पूर्ण झाले. शिल्पकलेचा हा अत्युत्कृष नमुना आहे. याचीच प्रतिकृती २२ क्रमांकाच्या लेण्यात आहे. ही लेणी राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या काळात खोदली गेली. २६ व्या लेण्यात बुद्ध निजलेल्या स्थितीत आहे.
घृष्णेश्वर – जवळच घृष्णेश्वर हे बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक मंदिर पूर्वाभिमुख आहे. हे शिवमंदिर असले तरी येथे पूर्ण प्रदक्षिणा घालतात. घृष्णेश्वराचे मंदिर अहिल्यादेवीनी उभारले. याच्या जवळच लक्षविनायकाचे मंदिर आहे व शिवाजी महाराजांचे आजोबा (जिजाबाई वडील) लखुजी जाधव यांच्या गढीचे अवशेष आहेत. येथे काचेचे जैन मंदिर पण आहे.
१२) पैठण – औरंगाबादपासून ३५ कि.मी. अंतरावर पैठण हे गोदावरी नदीच्या काठी पवित्र क्षेत्र आहे. संत एकनाथ यांचे हे जन्मस्थान व समाधीस्थानही. हे महानुभव व जैन धर्माचे पण तीर्थक्षेत्र आहे. एकनाथ महाराजांचा वाडा, त्यांचे समाधीस्थान, दत्तमंदिर, नरसिंह मंदिर, जायकवाडी धरण, नाथसागर, ज्ञानेश्वर उद्यान (प्रति वृंदावन गार्डन) ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. पैठण येथील २५ फूट उंचीची नक्षीदार दीपमाळ प्रेक्षणीय आहे. येथील पैठण्या अनेक शतकांपासून प्रसिद्ध आहेत.
१३) जायकवाडी- पैठणपासून ३ कि.मी. अंतरावर येथे नाथसागर नावाचा ४५० कि.मी. व्याप्तीचा जलाशय आहे व जवळच अभयारण्य आहे. त्यात २५० प्रकारचे पक्षी आहेत. जायकवाडीला मुक्त तुरूंगाचा यशस्वी प्रयत्न केला आहे. येथे बागेत काम करणाऱ्या कैद्यांशी प्रवाशांना बोलता येते. येथे ज्ञानेश्वर मंदिर आहे.
२. बीड जिल्हा
१) बीड – बिंदुसारा नदीच्या तीरावरचे हे स्थळ जिल्ह्याचे मुख्यालय आहे. याचे पूर्वीचे नाव चंपावती. येथे प्रमुख व बघण्यासारखी स्थळे सात आहेत. प्राचीन किल्ला, कनकालेश्वर मंदिर, खंडोबाचे मंदिर, खजाना विहीर, कपिलधारा, लिंब गणेश मंदिर.
२) आंबेजोगाई येथील प्रमुख स्थळे आहेत-कोरीव लेणी, योगेश्वरी देवीचे पीठ, खोलेश्वर मंदिर, कवी दासोपंत यांची समाधी,
३) नामालगाव – भारतातील २१ गणेश विद्यापीठांपैकी बिंदुसारा नदीवर हे गणेश मंदिर आहे.
४) परळी वैजनाथ हे बीडपासून ९९ कि. मी. अंतरावर
आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे जागृत देवस्थान आहे. अहिल्याबाई होळकर यांनी याचा जीर्णोद्धार केला होता. भरपूर पायऱ्या असलेल्या या मंदिराचे प्रवेशद्वार भव्य आहे. मंदिरात सभागृह व गर्भगृह एकाच पातळीवर आहेत. त्यामुळे सभागृहातूनही शिवलिंगाचे दर्शन होते. येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारले आहे.
५) राक्षसभुवन – गोदावरी नदीच्या काठावरील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. येथे मराठे व निजाम यांच्यात लढाई झाली. त्यात निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर मारला गेला. (हा प्रसिद्ध साडेतीन शहाण्यांतील एक शहाणा समजला जात अमे) त्याची समाधी येथे आहे. महानुभावाचे पांचाळेश्वर हे श्रेत्र येथे आहे.
६) सौताडा – हे ठिकाण धबधबा व मयूर अभयारण्य व धार्मिक क्षेत्र याकरता प्रसिद्ध आहे.
३. उस्मानाबाद जिल्हा (क्षेत्रफळ ७५१० चौ कि.मी.)
१) उस्मानाबाद – याचे प्राचीन नाव धारशिव. संत गोरा कुंभाराचे गाव तेर येथून ३२ कि.मी. अंतरावर आहे व तुळजापूर २३ कि.मी. अंतरावर आहे.
२) डोमगाव – कल्याणस्वामींची समाधी व मठ येथे आहे. समर्थ रामदासांनी सांगितलेला व कल्याणस्वामींनी लिहून घेतलेल्या दासबोधाची मूळ प्रत येथे आहे. (मात्र हा प्रसंग घडला शिवथरघळ येथे. हे रायगड जिल्ह्यात भोर-महाड रस्त्यावर वरंधा घाटात आहे. त्याला सुंदरमठ असेही म्हणतात.)
३) तुळजापूर – श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर बालाघाट रांगेच्या एका कडेवर आहे. हीं महाराष्ट्राची कुलस्वामिनी व शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे. मंदिर भव्य व स्वच्छ आहे. गोमुख तीर्थ, कल्लोळ व घाटशिलावरील देवीचे मंदिर जवळच आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. (कोल्हापूरची महालक्ष्मी व माहूरची रेणुका या दुसऱ्या दोन व नासिकजवळील सप्तशृंगी अर्धे पीठ मानली जातात)
४) तेर – संत गोरा कुंभाराचे जन्मस्थान, कर्मस्थान व समाधीस्थान. १५०० वर्षापूर्वी त्रिविक्रम मंदिर, सातव्या शतकातील उत्तरेश्वर मंदिर येथे आहे. कै. रामलिंगप्पा रामतुरे यांनी ऐतिहासिक वस्तूचा फार मोठा संग्रह येथे केला होता. त्याचे सरकारने आता संग्रहालयात रूपांतर केले आहे.
५) परंडा- हे गाव सीता व दुधना नद्यांच्या काठावर आहे. हा किल्ला महंमद गावीन याने बांधला. २६ बुरूजांची वैशिष्ट्ये आहेत. हंसराज स्वामींचा मठ व सोनारी भैरवनाथ मंदिर येथे आहे.
६) नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील बोरा नदीवरील हा किल्ला. नदीला बांध घालून त्यात बांधलेला पाणीमहाल तसेच अणदूर या जंवळच्या गावातील खंडोबाचे मंदिर ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
४. लातूर जिल्हा – (क्षेत्रफळ ७३०४ चौ.कि.मी.)
१) उदगीर- इ. स. १७६९ मध्ये येथे पेशवे व निजाम यांच्या युद्धात मराठी सैन्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी निजामाचा पराभव केला. उदगीरची लढाई इतिहासप्रसिद्ध आहे. येथील हत्तीबेट बघण्यासारखे आहे.
२) खरोसा येथे वाकाटक काळातील ६ व्या शतकातील टेकडीवरच्या लेण्या प्रसिद्ध आहेत. टेकडी अर्धा कि.मी. लांब व दीड कि.मी. रुंद आहे. लेण्यांत शिवपार्वती, कार्तिकेय, रावण यांच्या कोरीव कलाकृती तांडव नृत्य करताना आहेत. जवळच निलंगा गावात नील कंठेश्वर मंदिर व शिरूर येथील अनंतपाळाचे अनंतेश्वर मंदिर बघण्यासारखी आहेत.
५. जालना जिल्हा (क्षेत्रफळ ७४०५ चौ. कि.मी.)
१) जालना- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. शैक्षणिक व व्यापारी केंद्र. येथील गणपती मंदिर व राम मंदिर प्रसिद्ध आहेत.
२) जांब – समर्थ रामदासस्वामींचे जन्मस्थान. धुळ्याचे रामदास भक्ती श्री देव यांनी सन १९०५ मध्ये ते शोधून काढले व आता येथे भव्य मंदिर उभारले आहे.
३) राजूर-हे जालना-भोकसन मार्गावर आहे. येथे महागणपतीचे जागृत स्थान आहे.
६. नांदेड जिल्हा
१) नांदेड- जिल्ह्याचे मुख्यालय. हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. याचे पूर्वीचे नाव नंदिग्राम, शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंग यांची येथे सन १७०८ साली हत्या झाली. तेव्हापासून या स्थळास महत्त्व आले आहे. प्राध्यापक नरहर कुरूंदकर यांची ही कर्मभूमी येथे ताराचकार अशी आठ गुरुद्वारा मंदिरे आहेत. येथे वैशाखी व दसरा या दोन साहेब, हिराघाट, माता साहेब शिकाराराची समाज मोठ्या संख्येने येथे जमतो. रणजितसिंग यांनी समाधीस्थान व तख्त सचखंड गुरुद्वारा बांधले. रणजितसिंगांनी सन १८३७ मध्ये तेथील प्रसिद्ध गुरुद्वारा बांधले. येथे आठ गुरुद्वारा आहेत. तख्त सनखंड गुरुद्वारा बांधले सणजितसिंग स्थान आहे. जवळच गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर संगमावरील त्रिकुट मनार धरण, ४८ कि.मी. अंतरावर माहूरी, ९४ कि.मी. अंतरावर औंढा नागनाथ ही ठिकाणे आहेत.
२) किनवट – पेनगंगा नदीच्या परीसरात १४० चौ. कि.मी. व्याप्तीचे हे वन्य प्राणी अभयारण्य आहे.
३) माहूर रेणुका मातेचे मंदिर. ही देवता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ मानले जाते. तसेच येथील शिखरावर दत्त मंदिर आहे. रेणुका मातेच्या मंदिरासमोर रामगड किल्ला आहे.
४) विष्णुपुरी – आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प येथे आहे.
५) सहस्त्रकुंड येथील धबधबा व रमणीय परिसर पर्यटकांचे आकर्षण आहे.
६) उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
७) कंधार – हे ऐतिहासिक प्राचीन शहर आहे.
येथे भुईकोट किल्ला आहे. हे वास्तुपुरुषाचे भारतातील एकमेव ठिकाण आहे. राष्ट्रकूट व चालुक्य राजवटीत हे अतिशय ऊर्जितावस्थेत होते. केशवराजाची मूर्ती येथे उत्खननात मिळाली.
७. परभणी जिल्हा (क्षेत्रफळ ५५२० चौ.कि.मी.)
१) परभणी- हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
२) गंगाखेड – गोदावरी नदीवरचे एक पवित्र घाटक्षेत्र. जनाबाईची समाधी व बालाजी मंदिरासाठी हे प्रसिध्द आहे.
८. हिंगोला जिल्हा (क्षेत्रफळ ५५२१ चौ.कि.मी.)
१) औंढ्या नागनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे ठिकाण. येथील नागनाथ मंदिर हेमाडपंथी पद्धतीच्या शिल्पकलेचे व द्वादश कोनी आहे. हे पांडवांनी बांधले अशी आख्यायिका आहे. संत विठोबा खेचर व नामदेव नरसीचे हे गाव, नामदेवांच्या कीर्तनांच्या वेळी नागनाथ मंदिराने तोंड फिरवले (!!) अशी पण आख्यायिका आहे. येथे सिद्धेश्वर व येळदरी धरणे, नेमगिरी व शिरड शहापूर ही जैन तीर्थक्षेत्रे, प्राचीन भुयारी मंदिर नवागर ही स्थळे आहेत.
२) नरसी – संत नामदेवांचे जन्मस्थान, नृसिंह देवालय जवळच्या बामणी येथील अन्नपूर्णा व सरस्वती मंदिर ही स्थळे प्रसिध्द आहेत.