राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड़ राजा | जिला बुलढाणा | राजमाता जिजाऊ यांची माहिती ||  जिजाऊ निबंध

स्वराज्याला जिजामातेचे शुभाशीर्वाद

बाल शिवबाचे धडाडीचे उद्योग सुरू झाले. सह्याद्रीच्याकडेकपारीत अनेक मावळा गडी त्याने जमविले. मित्र बनवले. छोट्या-छोट्या फौजा तयार होऊ लागल्या. स्वराज्य उभारण्याची प्रेरणाशक्ती होती अर्थातच जिजामाता. तिच्याव सल्ल्याने आणि आशीर्वादाने तो शुभदिन उगवला. सारे रोहिडेश्वरी जमले. तेथील महादेवाच्या पिंडीला नमस्कार करून छोट्या शिवबाने आपल्या तलवारीने करंगळी कापली. तिच्या रक्ताचा अभिषेक पिंडीवर केला. तिथेच स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा साऱ्यांनी घेतली. या वेळी शिवबाला आपले गुरु दादोजी कोंडदेव यांची खूप आठवण झाली. शिवरायांनी रोहिडेश्वरी जिजाऊमातेच्या आशीर्वादाने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ केली. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या जिजामातेवर अगाध भक्तीशिवबाची आपल्या आईवर नितांत भक्ती होती. ते कधीच तिच्या मनाविरुद्ध वागले नाहीत. ती सांगेल तसेच के बागले. त्यांच्या परराख्या आईवर नितांत भक्ती होती तेरा नसत. मातेच्या सल्ल्याविना त्यांनी कोणतेच केले नाही. अगदी बारीक-सारीक भांडण असले तरी तरी ते आपल्या जिजामातेकडून सल्ला घेत असत. जेजुरीच्या मंदिरातील गुरवांमधील तंटा असो नाही तर युद्धाचा प्रसंग असो, दरवेळी आपल्या मातेशी सल्लमसलत करत. जिजामाता ही त्यांची उत्तम सल्लागार होती. खंडोबाच्या करून ते निवाडा

थोरल्या पुत्राचा शोक

इ. स. १६५५ साली जिजाऊवर मोठी आपत्ती कोसळली. तिच्या थोरल्या पुत्राचे संभाजीचे निधन झाले. शत्रूसैन्यातील बंडाळी मोडताना तोफेचा गोळा लागून संभाजीचा मृत्यु झाला. जिजाबाई शोकाकूल झाली. संभाजीचे वय तीस वर्षांचे होते. सोबत अफझलखानासारखा बडा सरदार असतानाही संभाजीचा असा मृत्यु व्हावा याचेच जिजाबाईला खूप आश्चर्य वाटत होते कदाचित् खानाने दगाफटका केला असला तर? मनात शंकेची पाल चुकचुकली. संभाजी जिजाबाईचा होती.

प्रिय पुत्र होता. त्या दिवसापासून जिजाऊच्या मनात अफझ‌लखानाविषयी खूप तिटकारा व संशयाची अढी बसली. याचा काटा कधी तरी काढलाच पाहिजे. तिचे मन सारखे म्हणत होते. शिवबाची स्वराज्य स्थापनेची वाटचाल गुपचूप चालू

जिजामातेचा ‘यशस्वीभव’चा आशीर्वाद

विजापूर दरबारात सारेच हवालदिल झाले होते. शेवटी शिवबाचा पराभव करण्याचा अफझलखानाने विडा उचलला. त्याने मोठ्या सैन्यासह प्रयाण केले. दक्षिणेकडे येताना वाटेतली मंदिरे फोडत, सुवर्ण मूर्ति लूटत खंडणी गोळा करीत निघालेल्या अफजलखानाने अगदी पंढरीच्या विठोबाचे मंदिर आणि तुळजापूरच्या भवानीमातेचे मंदिरही सोडले नाही. बेचिराख केले. खानाचे प्रचंड सामर्थ्य प्रचंड होते. कपटी स्वभावामुळे जिजामाई चिंतातूर झाली. खूप विचार करून १० नोव्हेंबर १६६० रोजी शेवटी जावळीच्या प्रांतात दाट झाडीत, प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची आणि शिवबांची सदिच्छा भेट ठरली. भेटीसाठी शानदार तयारी करण्यात आली. उंची शामियाना उभारण्यात आला. शिवबाच्या प्राणावर बेतले तर…. त्या दिवशी राजांनी प्रातः काली जरा लवकरच जिजामातेची भेट घेतली. तिचे आशीर्वाद मागितले. मातेच्या चरणावर मस्तक ठेवले. जिजाऊने शिवबाला उठवत ‘यशस्वी भव’ असा आशीर्वाद दिला. दग्याच्या भितीने मन घाबरले होते. निघताना शिवबांनी चिलखतावर अंगरखा चढविला. मोठ्या अंगरख्यात बिचवा लपवला आणि हातामध्ये गुपचूप वाघनखे चढवली. अखेर ज्याची भिती होती तेच घडले. खानाने दगा केला. शिवबांवर वार केला त्याचक्षणी राजांनी चपळाईने वाघनखे खानाच्या पोटात खुपसली. खान अयाई करीत जागीच कोसळला. शिवबाच्या या पराक्रमाची वार्ता जिजाऊच्या कानावर गेला. तेव्हा तिला खूप आनंद झाला. तिचा प्राण म्हणजेच तिचा लेक सुखरूप वाचला होता. खानाचा वध झाल्याने चिंता गेली. शिवबा लगोलग जिजामातेला भेटायला आले त्यावेळी जिजाऊने त्यांची मीठ- मोहरीने दृष्ट काढली. दानधर्म केले. खान मरताच सैन्याचे धाबे दणाणले. मराठ्यांनी त्यांना पळवून लावले. खानाकडून अमाप संपत्ती मिळवली. खानाचा मुलगा फजलखान मात्र वाचला. शिवबांनी खानाच्या बायकांना सोडून दिले. परस्त्री मातेसमान असे संस्कार होते त्यांच्यावर, जिजाऊने नेहमी. शिकवले होते की गाय, स्त्री आणि अगतिक ब्राह्मण यांच्यावर कधीच शस्त्र उगारायचे नाही अथवा त्यांना उगाचच त्रास द्यायचा नाही. अफझलखान वधानंतर मराठ्यांचे सामर्थ्य वाढले. पाठोपाठ शिवरायांनी पन्हाळा सर केला. पुढे पन्हाळा मिळविण्यासाठी सिद्धीजोहारला पाठवण्यात आले. त्याने १६६० साली २ मार्चला पन्हाळ्याला मोठा वेढा दिला आणि शिवाजी राजे पन्हाळ्यात अडकून पडले. आता काय? कसे बाहेर पडायचे हा मोठा प्रश्न पडला.

जिजाई शिवबाच्या काळजीने चिंताग्रस्त

अफझलखानाचे संकट दूर झाले पण राजे आता सिद्धीजोहरच्या मगरमिठीत पन्हाळ्यात अडक्ले होते. त्यावेळी जिजामाता राजगडी वास्तव्यास होत्या. शिवबाच्या काळजीने त्या अस्वस्थ झाल्या. सतळ्यात अडकले होते. त्याकरत होत्या. पुत्रदर्शनाची ओढ लागली होती. दिवस जात होते.

एकदा नेताजी पालकरला न राहवून त्या म्हणाल्या, ‘मीच जाते आणि जोहरचे मुंडके कलम करून आणते. माझ्या शिवबावाचून मला सारे निष्फळ आहे. सिंहाप्रमाणे महापराक्रमी माझा शिवबा अडकला आहे. तेंव्हा मीच जाते.’ हे बोलणे ऐकून नेताजी पालकर घाबरले. त्यांनी जिजामातेला थांबवले. इकडे पन्हाळ्यावर रसद संपत आली होती. त्याच रात्री तुळजाभवानी माता राजांच्या स्वप्नात दृष्टांत देत म्हणाली, ‘पुत्रा तुझी माता तळमळते आहे. हा किल्ला तू सोडून जा. लगेच बाहेर पड आणि राज्य सांभाळ.’ देवीची आज्ञा होताच शिवरायांनी भर पावसात निवडक मावळ्यांसह पन्हाळा सोडला. बाजीप्रभू देशपांड्यांनी घोडखिंडीत शत्रूला अडवून ठेवले. ‘राजे विशालगडी पोहोचताच तोफांची सलामी द्या तोपर्यंत मी शत्रूला अडवतो.’ असे वचन देत खरोखर बाजीप्रभूने पराक्रमाची शर्थ केली. राजे सुखरूप पोहोचले. त्यांची तोफ ऐकताच त्या वीराने प्राण सोडले. बाजीप्रभूच्या पराक्रमामुळेच शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचले आणि तिथून लगोलग ते जिजामातेच्या भेटीला राजगडी गेले. राजांना पहाताच जिजाऊंचे अंतःकरण भरून आले. आज बाजीप्रभूमुळे आपला मुलगा परत आला हे जिजाऊ विसरल्या नाहीत. त्यांनी बाजीप्रभूच्या कुटुंबाला आधार दिला.

माँसाहेब सती जाऊ नका हो!

शिवबांच्या पराक्रमाची वार्ता ऐकून शहाजी राजे आनंदले. कधी एकदा पुत्राला भेटतो असे त्यांना झाले होते. आदिलशहाची परवानगी घेऊन ते महाराष्ट्रात निघाले. जिजाऊला आणि शिवरायांना भेटायला आतूर झाले होते. जेजुरी आल्याचे कळताच आपल्या पित्याची भेट घेण्यासाठी शिवबा अनवाणी आंला. जिजाऊलाही खूप आनंद झाला. मग पिता-पुत्रा-माता अशा सुखदुखाच्या गोष्टी झाल्या. शिवबांचे स्वराज्याचे स्वप्न शहाजीराजांना आवडले. त्यांची छाती गर्वाने फूलून आली. त्यावेळी रायगडालाच राजधानी करा असा सल्ला शहाजीराजांनी दिला. मग निरोप घेण्याचा दिन आला. शहाजीराजांना तातडीने कर्नाटक मोहिमेंवर जाण्याचा आदेश होता. वारणेपर्यंत जिजाऊ आणि शिवरायांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.

माघ महिना आला. एक दिवस बातमी थडकली की शहाजीराजे हरणाची शिकार करता करता घोड्यावरून पडून मृत्युमुखी पडले. त्याच वेळी शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडली होती व सुरतचा खजिना लुटला होता. हे पराक्रम त्यांच्या पित्याने ऐकले होते. पण शिवबांचे कौतुक करायला ते होते कुठे? त्यांचे बसवपट्टणला निधन झाले. जिजाऊला ही बातमी कळताच ती सती निघाली. शहाजीराजांचे वय मृत्युसमयी शहाजीराजांचे वय ७० वर्षाचे होते तर सती जायला निघालेल्या जिजाऊचे वय ६७ होते. राजांना आपली माता सती जाण्यासाठी निघाली आहे हे कळताच त्यांनी मातेपाशी धाव घेतली. तिला अडवले. मातेचे पाय धरले व विनवणी केली, ‘माँ साहेब, माझा पराक्रम पहायला तुम्ही तरी थांबा. मला स्वतंत्र स्वराज्य निर्माण करायचे आहे. माँसाहेब नका ना सती जाऊ’ पुत्र मोह-पाशात जिजाऊ गुंतून पडली. स्वराज्याचे स्वप्न आपला पुत्र पूर्ण करीत आहे. तेव्हा स्वराज्याचा सूर्योदय पाहूनच आपण डोळे मिटूयात असे जिजामातेने ठरविले.

जिजामातेचा राज्यकारभार

जयसिंगाच्या पुरंदर करारामुळे राजे औरंगजेबाला भेटायला दिल्लीला गेले. औरंगजेबाने कनिष्ठ ओळीत उभे करून अपमान केला. ते तडक दरबार सोडून गेले. पण औरंगजेबाने त्यांना नजरकैद केले. छोटा संभाजी आणि राजे बरेच दिवस नजर कैदेत होते, राजांना सोडण्याची औरंगजेबाची इच्छाच नव्हती. इकडे जिजामातेला वार्ता कळताच तिला रडूच कोसळले. माझ्या शिवबाचे काही बरे-वाईट तर होणर नाही ना? मनात शंकांनी घर केले. रोज ती आई जगदंबेला आळवू लागली. शिवरायांनीही निसटण्याची योजना ठरवली. ते संतांना दानधर्मार्थ फळाचे व मिठाईचे पेटारे पाठवू लागले. आजारपणाचे सोंग त्यांनी छान वठवले. औरंगजेबाला सारे खरे वाटले.

अन् तो दिवस उजाडला, शिवरायांनी धाडस केले मिठाईच्या पेटाऱ्यात बसून संभाजीसह पळ काढला. वेषांतर करून ते सर्वप्रथम मथुरेस गेले. तिथे बाल संभाजीला मोरोपंतांच्या मेव्हण्याकडे ठेवले. स्वतः लपत छपत, वेषांतर करीत ते रायगडावर पोहोचले. जिजामाता डोळ्यात प्राण आणून त्यांची रोज वाट पहात होती. जिजामातेने कारभार राजांच्या गैरहजेरीत योग्यपद्धतीने चालवला बैरागी साधूंनी एक दिवस जिजामातेचे दर्शन मागितले. आश्चर्य म्हणजे त्या बैराग्याने मातेच्या चरणावर मस्तक टेकवले. तेव्हा जिजामाता गडबडल्या आणि भावपूर्ण होत म्हणाल्या, ‘ऊठ शिवबा, तू आलास आम्ही धन्य झालो. देवी पावली. पण माझा बाळ संभाजी कुठे आहे?’ या प्रश्नावर मात्र शिवाजी राजांनी संभाजीला मथुरेतच ठेवल्याचे सांगितले. जिजामातेला खूप वाईट वाटले. परंतु पुत्र भेटला हेही नसे थोडके, शिवरायांनी मोरोपंताच्या मेव्हण्याला २५ हजार होन पाठवले. योग्यवेळी ते बाल संभाजीला घेऊन राजगडावर आले. आता शिवाजी राजांचे राज्य दाहीदिशा पसरू लागले होते.

जिजाबाईचे सोनेरी स्वप्न साकार

एकदा जिजामाता शिवरायांना म्हणाली, ‘शिवबा, तू आता स्वतःला राज्याभिषेक करून घे. या हिंदवी स्वराज्याचा

राजा हो. मी जाण्यापूर्वी तुझा राजाभिषेकाचा सोहळा मला बघू दे. ते सुख मला दे.’ मावळ्यांनी १६७० साली कोंढाणा सर केला पण शिवरायांचा जिवलग सोबती तान्हाजी मालुसरे गेला. राज्याभिषेकापूर्वी कोंढाणा सर करावा अशी माँसाहेबांची इच्छा राजांनी पूर्ण केली. पण त्यासाठी सिंहाचा बछडा सरदार तान्हाजी मालुसरे गमवावा लागला.

कोंढाणा जिंकल्यानंतर पंधरा दिवसांनी सोयराबाईला पुत्र रत्न झाले. त्याचे नाव राजाराम होय. आता जिजामाता

वयोमानाने थकली होती. देवधर्म आणि पुराण श्रवणात वेळ घालवू लागली. राजांनी तिच्यासाठी खास व्यवस्थ केली. कारकून, पुराणिक, दिवाण, नोकर-चाकर, वैद्य यांची नेमणूक केली होती. म्हातारपणीसुद्धा जिजामातेच्या सुखसोयीत कमतरता नव्हती. शिवरायांनी जिजामातेच्या आज्ञेने स्वतःला राज्याभिषेक करण्याचे ठरविले. १६७४ हे वैभवी साल उजाडले. शिवराज्याभिषेकासाठी रायगड सजू लागला. दूरदेशातून अनेक पराक्रमी राजे, सरंदार आले. ६ जून १६७४ रोजी पहाटे

पाच वाजता शिवाजी राजे सिंहासनावर बसण्यापूर्वी जिजामातेला प्रणाम करण्यास गेले. मगसोहळा सुरू झाला. गागाभट्टांनी पवित्र नद्यांमधील जलाचा त्यांच्यावर वर्षाव केला. अनेक सरदार मानकऱ्यांचे मुजरे राजांनी स्विकारले. अष्टप्रधान मंडळ दिमतीला होते. शिवरायांची मुंज करण्यात आली. पुनश्च वैदिकपद्धतीने लग्न लावण्यात आले व संकटनाशक सुवर्णतुला भव्य दिव्य प्रकारे करण्यात आली. प्रत्यक्ष राज्यारोहण समारंभ शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध १३ म्हणजेच शुक्रवारी दिनांक ६ जून १६७४ या दिवशी संपन्न झाला. अनेक देश अगदी गोरे इंग्रज सुद्धा सोहळ्याला भेट- वस्तू घेऊन उपस्थित होते. जिजामातेच्या डोळ्यांचे अगदी पारणे फिटले होते जणू या सोहळ्याने. हा अनुपम अवर्णनीय सोहळा पाहून तिचे जीवन कृतकृत्य झाले होते.

रात्री शिवाजी राजांना जवळ बोलावून तिने आपल्या हाताने स्वतः त्यांची दृष्ट काढली. जिजाऊ म्हणाली, ‘शिवबा आज तू हिंदवी स्वराज्याचा राजा झालास, पुरुषार्थाची, महापराक्रमाची शर्थ केलीस. प्रजेला निर्भय बनविलेस म्हाताऱ्या डोळ्यांना हे दाखवून सुखी केलेस. खरंच माझे भाग्य थोर मी हा सोन्याचा दिवस पाहिला. आता मात्र कसलीच इच्छा राहिली नाही.’ त्या दिवसानंतर जिजामाता पाचाडला गेली व देवाचे नाव घेत राहू लागली.

जिजामातेचा अंत

पाचाडला नित्यक्रम चालू असतानाच अचानक एक दिवस जिजामातेची प्रकृती खूपच बिघडली. तो दिवस होता १७ जून १६७४ म्हणजे राज्याभिषेकानंतर अवघ्या अकरा दिवसांनी मध्यरात्र समयी जिजामातेने आपली इहलोकीची यात्रा संपविली. प्राण सोडला त्यावेळी शेवटी राजे तिच्या जवळच होते हे समाधन त्या मातेला मिळाले होते. अखेर राजांना भडभडून आले. पण त्यांचा शोक आतल्या आत होता कारण ।। लाखांचा पोशिंदा तो, बहुतजनांचा आधारू ऐसा थोर पुरुष तो शिवराया ।। राजे कर्तव्याला कधीच चुकले नाहीत. जिजामातेची यशदायी कारकीर्द संपली. खरंच जिजा ही आदर्श पत्नी होती, तसेच ती आदर्श माता होती. तिची थोरवी वर्णावी तेवढी थोडी आहे. शब्द अपुरे पडतील. तिचे गुणवर्णन करायला बखरकार म्हणतात शब्द अपुरे पडतील. आमुची लेखणी थिटी पडे। ऐसी थोर माता असे जिजाई। खरच आजच्या युगातही जिजाऊ सारख्या स्त्रियांची गरज आहे. जिजामातेचे चरित्र आदर्शपूर्ण आहे.

Leave a Comment