स्वामी विवेकानंद चरित्र / रामकृष्ण-विवेकानंद केंद्र, न्यूयॉर्क || रामकृष्णदेवांची भेट

रामकृष्णदेवांची भेट

१८८० मध्ये नोव्हेंबर महिन्यात कलकत्त्यातील शिमला नावाच्या मोहोल्ल्यात श्रीयुत सुरेंद्रनाथ मित्र ह्यांच्या घरी आज दक्षिणेश्वरचे संत श्रीरामकृष्णदेव येणार होते. ते येणार म्हणून सगळी तयारी चालली होती. त्यांच्यातला एकजण म्हणाला, ‘अहो, आपण जो भजन म्हणणारा ठरविला होता ना, तो खूप आजारी आहे. दोनचार ठिकाणी गेलो पण भजन गाणारा मिळत नाही आता करायचे काय?’
तेवढ्यात सुरेंद्रनाथांच्या बायकोने सांगितले, ‘अहो, तो दत्त वकिलांचा मुलगा नरेंद्र आहे ना, तो खूप छान गातो म्हणे, त्यालाच बोलावून आणा ना भजन म्हणायला. लगेच नरेंद्राला बोलावण्यात आले. नरेंद्र त्या बैठकीत आला. त्याठिकाणी रामकृष्णदेवांना प्रथमच त्याने पाहिले.

नरेंद्राचे भजन ऐकून श्रीरामकृष्णांना खूपच आनंद झाला. त्यांनी नरेंद्रविषयी सर्व माहिती विचारली आणि जाताना नरेंद्राला जवळ बोलवून म्हणाले, ‘दक्षिणेश्वरी ये एकदा,”नक्की येईन.’ नरेंद्र त्यांना म्हणाला. कॉलेजची गडबड संपल्यावर नरेंद्रनी आपले दोनचार मित्र बरोबर घेतले आणि तो दक्षिणेश्वरी गेला.

नरेंद्र नारायणाचा अवतार
कलकत्त्यापासून दक्षिणेश्वर खूप दूर होते. एका राणी रासमणी श्रीमंत स्त्रीने तेथे कालीदेवीचे भव्य मंदिर बांधले होते.
त्या मंदिराचे श्रीरामकृष्ण पुजारी होते. कालीदेवीचे ते अगदी परमभक्त होते. रात्रंदिवस ते कालीदेवीचे ध्यान करण्यात मग्न असे. ते कालीदेवीबरोबर बोलत, कालीदेवीही त्यांच्याबरोबर बोलत असे. हजारो लोक त्यांच्या दर्शनाला येऊन विद्वान लोक त्यांचा उपदेश घेत.

नरेंद्राला पाहून रामकृष्णांना खूप आनंद झाला. खूप जुनी ओळख असल्यासारखे ते नरेंद्रशी बोलू लागले. म्हणाले, ‘तू इकडे येण्यास का उशीर केलास? मी तुझी खूप वाट पहात होतो. तुझ्या सारख्या त्यागी तरुणाला पाहून मला खूप आनंद झाला आहे.’ एवढे बोलून रामकृष्णांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. हात जोडून ते नरेंद्राला म्हणाले, ‘तुम्ही साक्षात नारायणाचा अवतार आहात. लोकांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही जन्माला आला आहात!’या गोष्टीचा विचार करीत करीत नरेंद्र घरी आला.

ईश्वर दर्शनाची इच्छा !

नरेंद्र आता नेहमीच दक्षिणेश्वरी जायला लागला. श्रीरामकृष्णांना तो निरनिराळे प्रश्न विचारत असे. एखादी गोष्ट पटली नाही तर कडक शब्दांत तो ती बोलून दाखवी. श्रीरामकृष्णांच्या इतर शिष्यांना नरेंद्राचा खूप राग येई. पण श्रीरामकृष्णांना नरेंद्राचा कधीच राग आला नाही. नरेंद्रने कसाही प्रश्न विचारला तरी ते न रागवता शांतपणे हसत उत्तर देत. त्याने आडून खोचक बोचक प्रश्न विचारले तरी त्याला अगदी सरळपणे उत्तर देत. नरेंद्र आता रोजच दक्षिणेश्वरी जाऊ लागला. तो जणू त्याचा दिनक्रमच ठरला होता. काहीवेळेस मुक्कामही तिथेच करीत असे. श्रीरामकृष्णांवर त्याची बारीक नजर होती. ते खरे साधू आहे की ढोंगी, लबाड तर नाही ना?…. भलत्याच माणसाच्या नादी आपण लागलो नाही ना?…. अशा शंका अधून मधून नरेंद्राच्या मनात येत असे म्हणून तो श्रीरामकृष्णांवर कडक पहारा ठेवून त्यांच्या सगळ्या हालचाली पहात राही. नरेंद्राची हळूहळू खात्री झाली की श्रीरामकृष्ण थोर भक्त आहेत, महापुरुष आहेत ! मला ते ईश्वरदर्शन घडवतील का? त्यांनी ईश्वराला पाहिले असेल का? असा प्रश्न त्यांना विचारल्यावर ते काय म्हणतील. आजपर्यंत मला या प्रश्नाचं उत्तर कोणीच दिले नाही. नरेंद्राच्या मनात विचार घोळू लागले. या विचाराने त्याला रात्रभर झोप येईना.

नरेंद्र धीर करून श्रीरामकृष्णांजवळ गेला आणि त्यांना विचारले, ‘महाराज, आपल्याला ईश्वराचे दर्शन घडले आहे का?’ श्रीरामकृष्णांनी एक स्मित हास्य करत म्हणाले, ‘होय नरेंद्र, मला ईश्वराचे दर्शन झाले आहे. तुला आता बघतो आहे ना. अगदी तसेच मी ईश्वराला पाहिले आहे अगदी जवळून. ‘ते ऐकून नरेंद्राला खूप आनंद झाला व आश्चर्यही वाटले. श्रीरामकृष्णदेव त्याला म्हणाले, ‘तुला बघायचे आहे ईश्वराला? मी सांगेन त्याप्रमाणे तू वागलास तर तुलाही ईश्वर दर्शन घडवू शकतो!’

श्रीरामकृष्णांचे हे उद्‌गार ऐकून नरेंद्राला खूपच आनंद झाला. नरेंद्राला उठल्याबरोबर कधी रामकृष्णांना भेटतो असे वाटत. दोघांनाही एकमेकाना पाहिल्याशिवाय रहावत नव्हते इतकी दोघांना एकमेकांची ओढ निर्माण झाली होती कारण कालीदेवीने रामकृष्णांना नरेंद्र हा नारायणाचा अवतार आहे असे सांगितले होते. एके दिवशी नरेंद्र रामकृष्णांजवळ येऊन बसला, संध्याकाळची वेळ होती. वातावरणही प्रसन्न होते. श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथाकडे एकसारखे टक लावून पहात होते. बराच वेळ पाहून झाल्यावर ते उठले आणि त्यांनी आपला पाय नरेंद्रनाथांच्या खांद्यावर ठेवला. त्यावेळी नरेंद्राची समाधी लागली.

आपण उंच आकाशात जात आहोत असे त्याला वाटत होते. ईश्वराचे लखलखीत तेज पाहात आहोत असे त्याला वाटले. मग श्रीरामकृष्णांनी त्याच्या छातीवरून हलकेच हात फिरविला. तेव्हा तो नेहमीच्या जगात आला. पूर्वीसारखे त्याला दिसू लागले. त्याने डोळे उघडून पाहिले. समोर श्रीरामकृष्ण नेहमीसारखे हसतमुख उभे आहेत ! रामकृष्णांच्या सान्निध्यात राहून नरेंद्र खूप काही शिकला होता. परंतु आता श्रीरामकृष्णांचा सहवास लवकरच संपणार होता कारण….

श्रीरामकृष्णांचा मृत्यु

१८८५ मध्ये श्रीरामकृष्णांना गळ्याचा आजार झाला. उपाय केले परंतु आजार वाढतच गेला. शेवटी त्यांच्या भक्तमंडळींनी त्यांना कलकत्त्याला आणले. त्यांच्यासाठी काशीपूर मोहोल्ल्यात एक घर भाड्याने घेऊन भक्तमंडळी त्यांची सेवा करू लागले. आपल्या गुरुच्या सेवेसाठी नरेंद्रानेही आपली शिक्षकाची नोकरी सोडली आणि तो काशीपूरला येऊन राहिला. श्रीरामकृष्णांच्या आजारपणाच्या काळात सगळ्यांची एकजूट बनली. नरेंद्र सर्व शिष्यांचा नेता बनला. गुरुसेवेशिवाय इतर वेळी तो खूप वाचन करी; ध्यान करी, जप-तप करी. नरेंद्र निरनिराळ्या विषयांची माहिती सांगत. श्रीरामकृष्ण यांनी त्यांची सर्व विद्या नरेंद्राला दिली होती. श्रीरामकृष्णांचा आजार वाढत गेल्याने डॉक्टर वैद्यांनी खूप प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. शेवटी १५ ऑगस्ट १८८६ रोजी रविवारी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली.

मठ सांभाळायचे काम

श्री रामकृष्णांच्या मृत्यूनंतर मठाचे काम पहाणे विवेकानंदाकडे आले. रात्रंदिवस घ्यान, पूजा, वाचन, मनन करीत. विवेकानंद मठाचे काम पाहू लागले. ते सांगतील त्याप्रमाणे सर्व शिष्यगण वागत. ते पूर्णपणे मठात राहू लागल्याने जवळ जवळ संन्याशीच चनले होते. संन्याशाने एका जागी राहू नये असे त्यांचे मत होते म्हणून इ.स. १८८८ मध्ये नरेंद्रनाथ तीर्थयात्रेसाठी निघाले. ते प्रथम काशीला गेले. तेथे देवदेवतांचे दर्शन घेऊन. अनेक साधुसंतांना ते भेटले. काही विद्वानांचा त्यांनी वाद‌विवादात हरवलेही. त्यांचे तेज पाहून अनेक लोक त्यांच्याभोवती गोळा होऊ लागले. पण विवेकानंदांना एके ठिकाणी रहायचे नव्हते. लवकरच ते अयोध्येला गेले. श्रीरामाच्या पवित्र जन्मभूमीत त्यांनी काही दिवस घालविले. त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास चालूच होता. खेतडीच्या नरेशांजवळ स्वामीजी पातंजल भाष्य शिकले. पोरबंदर येथे शंकर पांडुरंग पंडित होते, त्यांच्याजवळ स्वामीजी महाभाष्य शिकले.

विवेकानंद शिकागोला गेले

विवेकानंदांना शंकर पांडुरंग म्हणाले, ‘स्वामीजी, तुमच्यासारख्यांनी सातासमुद्रापलीकडे जाऊन आपल्या धर्माची किर्ती वाढविली पाहिजे!’ यांवर विचार करत फिरत फिरत विवेकानंद हैद्राबादला आले. हैद्राबादहून ते मद्रासला परत आले. मद्रासमधील त्यांच्या शिष्यांनी पुन्हा त्यांना शिकागो येथे जाण्याचा आग्रह केला.

इ. स. १८९३ मध्ये ३१ मे ला विवेकानंदांनी अमेरिकेला जाण्यासाठी भारताचा किनारा सोडला. मुंबईहून कोलंबो, सिंगापूर, हाँगकाँग, याकोहामा ही बंदरे घेत घेत जहाज व्हँकूव्हर बंदरात येऊन पोहोचले. तेथून आगगाडीने स्वामीजी शिकागोला पोहोचले. परंतु तिथे कोणाचीही ओळख नसल्याने त्यांची एका स्त्रीशी ओळख झाली, तिने आपल्या घरी नेले व तिथेच ते राईटसाहेब त्यांना भेटले. स्वामीजींचे तेज, बुद्धी, ज्ञान व बोलण्याची शैली पाहून राईटसाहेब चकीत झाले.

शिकागोतील सर्वधर्मपरिषद

११ सप्टेंबर १८९३ ला परिषदेचा दिवस होता. हजारो लोक सभागृहात जमू लागले. सभागृह पूर्ण भरला होता. समोर मोठा ओटा बांधला होता, त्यावर बोलणारे प्रतिनिधी बसले होते. स्वामीजींनाही तेथेच बसविण्यात आले. कोणी पुस्तके चाळीत होते. कोणी आपली टिपण वाचीत होते. पण स्वामीजी अगदी शांत होते. अनेकांची भाषणे झाली. दुपारनंतर स्वामीजींची भाषणाची वेळ आली. साहेबांनी त्यांची ओळख करून दिली. विवेकानंद भाषणासाठी जाऊन उभे राहिले. त्यांच्या भगव्या रंगाच्या पोशाखाकडे पाहूनच अनेकांची मने गदगदून गेली. तेवढ्यात त्यांच्या तोंडून गोड पण खणखणीत आवाजात शब्द बाहेर पडले-‘अमेरिकेतील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो!’ हे शब्द ऐकताच टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला. दोन मिनिटांपर्यंत सलग टाळ्या वाजत राहिल्या. त्या शब्दांमध्ये जितके तेज होते तितकेच प्रेमही होते. किती आपलेपणाने त्यांनी ते शब्द उच्चारले होते. ‘अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो!’ या वाक्यानेच विवेकानंदांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली आणि मग शुद्ध विचारांनी भरलेले त्यांचे भाषण पुढे चालू झाले.

तेथे जमलेल्या सगळ्या प्रतिनिधींपेक्षा विवेकानंद वयाने लहान होते. पण आता ते कीतींने व मानाने सर्वांपेक्षा मोठे झाले. इतर सर्वांची भाषणे लोक विसरून गेले, पण विवेकानंदांची भाषणे लोकांच्या कानात तशीच घुमत राहिली. त्यांची मूर्ती अमेरिकन लोकांच्या डोळ्यांसमोर तशीच चमकत राहिली.

स्वामींजीचे कार्य

अमेरिकेत स्वामीजींचे काम एकसारखे वाढतच होते. कामाबरोबर कीर्तीही वाढत होती. ते सतत अठरा अठरा तास एकसारखे काम करीत. इतर लोक त्यांना विश्रांती घ्यायला सांगत; पण ते विश्रांती घेत नसत. आजारी पडले तरी त्यांचे बोलणे, लिहिणे, उपदेश करणे चालूच असे.

आपल्या देशावर त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते. अमेरिकेत अनेक ठिकाणी विवेकानंदांच्या सभा झाल्या. अनेक लोक त्यांचे शिष्य बनले. त्यापैकी मिस मागरिट ई. नोबेल हे नाव विशेष महत्त्वाचे आहे. ती श्रीमंत घरातील व कुलीन स्त्री होती. शिक्षिका असूनही तीही स्वामीजींची शिष्य बनली होती.

स्वामीजी काही दिवस बोस्टन येथे राहिले. ‘कर्मयोग’ ह्या विषयावर त्यांनी खूप व्याख्याने दिली. ती व्याख्याने लिहून काढून ‘कर्मयोग’ नावाचे पुस्तकही प्रसिद्ध करण्यात आले.

ह्याच सुमारास इंग्लंडचे रहिवासी श्री. जे. जे. गुडविन न्यूयॉर्क येथे आले. ते उत्तम लघुलेखक होते. स्वामीजींची व्याख्याने ते लिहून घेऊ लागले. पुढे ते स्वामीजींचे शिष्य बनले. त्यांनी आपला सगळा उद्योग सोडून दिला व ते स्वामीजींबरोबरच फिरू लागले. त्यांच्यामुळेच स्वामीजींची शेकडो व्याख्याने आज आपल्याला शब्दशः वाचायला मिळतात. श्री. जे. जे. गुडविन स्वामीजींबरोबर हिंदुस्थानात आले व इथेच मरण पावले.

विवेकानंदांचे तिकडचे काम वाढू लागले तसतशा अडचणीही वाढू लागल्या. विशेषतः ख्रिस्ती मिशनरी लोक खूप विरोध करू लागले. ते म्हणाले, ‘अरे, हा हिंदू संन्यासी आपल्याला आपला धर्म सोडायला लावून ख्रिस्ती लोक हिंदू बनत आहेत. हिंदूंनी जणू आपल्यावर स्वारीच केली आहे!’ पण ह्या सगळ्या लोकांची लढण्याची साधने होती निंदा, कुटाळी, खोट्या अफवा आणि शिव्या !

तर विवेकानंदांची साधने होती-सत्य, ईश्वरभक्ती, शुद्ध चारित्र्य, प्रेमळ वागणूक आणि गोड बोलणे !

शेवटी सत्याचा विजय झाला आणि असत्याचा पराजय झाला. न्यूयॉर्क येथे ‘वेदान्त सोसायटी’ची स्थापना झाली. शेकडो लोक तिचे सदस्य बनले. मोठमोठे, नावलौकिक असलेले लोक तिचे कार्य करू लागले.

विवेकानंद कलकत्त्याला आले. आल्यावर एका आठवड्याने शोभा बाजारामधील राधाकांत देव यांच्या वाड्यासमोर भली मोठी सभा झाली. त्यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी आणि विद्वानांनी, कर्मचाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी, श्रीमंतांनी आणि गरिबांनी, गावात आणि शहरात राहणाऱ्यांनी सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.

त्यांच्यासमोर स्वामीजींनी अतिशय तेजस्वी असे भाषण करून त्यांना सांगितले की- ‘बंगालच्या सुपुत्रांनो, वीर बना! कोणत्या तरी चांगल्या तत्त्वावर श्रद्धा ठेवा आणि त्या श्रद्धेसाठी आपले सगळे जीवन अर्पण करा. आपले शील उत्तम ठेवा. जगात पराक्रम करा आणि त्यायोगे आपले आणि आपल्या देशाचे नाव उज्जवल करा !

मी पायाभरणी केली आहे. त्यावर सुंदर इमारत उभी करण्याचे काम तुमचे आहे. कोणातरी महापुरुषाच्या ठायी भक्ती जडल्याशिवाय आणि त्याच्या ध्वजाखाली एकत्र आल्याशिवाय कोणताही देश आपली प्रगती करू शकत नाही.

त्यामुळे हे वीरांनो, ‘तुम्ही एकत्रित या, संघटित व्हा आणि समूहाने देशाचे नेतृत्त्व करा !’ स्वामीजी स्वतः या गोष्टी बघू लागले. सेवकांची लहानमोठी पथके तयार करण्यात आली. जनतेच्या सेवेची ती खूप मोठी योजना पाहून लोकांना पुरेपूर समजले की, विवेकानंद वेदान्त नुसते बोलत नाहीत तर तो प्रत्यक्ष आचरणात आणतात. विवेकानंद नेहमी म्हणत असत, ‘जिथे जीव तिथेच शिव!’

स्वामीजींची शिकवण

दुसऱ्यांदा इंग्लंड-अमेरिकेला स्वामीजी जाणार होते. त्यावेळी १९ जून १८९९ रोजी, बेलूर मठात स्वामीजींना निरोप देण्यासाठी एक लहानशी सभा घेतली. त्यात स्वामींजीनी भाषणपर शिकवण दिली. ती म्हणजे

* साधारण लोकांचे जगण्यावर प्रेम असते, तुमचे मरण्यावर प्रेम असावयास पाहिजे, मरण्यावर प्रेम असणे म्हणजे

आत्मबलिदान करण्यासाठी नेहमी तयार असणे. * संन्यासी बनणे म्हणजे गुहेत बसून ध्यान करणे नाही तर या जगातील प्रत्येक मनुष्य आपला भाऊ आहे. त्याची

प्रगती होण्यासाठी त्याला मदत करणे हे आपले काम आहे.

* मनात नेहमी चांगल्या भावना असल्या पाहिजेत व आपल्या हातून नेहमी काहीना काही काम होत राहिले पाहिजे. जितक्या आनंदाने गीता वाचायची तितक्याच आनंदाने मठाची जमीन नांगरायलाही तयार व्हायचे. आपण शास्त्रचर्चा करायलाही तयार असावे, मठाच्या जमिनीत झालेले धान्य बाजारात जाऊन विकण्यासही तयार असावे.

* दुसऱ्यांशी वागण्यात आपण फुलासारखे कोमल असले पाहिजे तर नियम पाळण्यात आपण वज्रासारखे कठोर असले पाहिजे.

* जीवनात वेलीसारखे नम्र, कुत्र्यासारखे आज्ञाधारी बना.

विवेकानंदांची प्राणज्योत मालवली

विवेकानंद आता थकले होते पण मन तरुण होते. आता आपण थोडेच दिवस जगणार हे त्यांना कळून चुकले होते. ४ जुलै इ. स. १९०२ हा दिवस उजाडला. नेहमीप्रमाण

Leave a Comment