बालपण

कलकत्यामध्ये शिमुलिया गल्लीत दत्त घराणे लोकप्रिय होते. तेथे एक प्रसिद्ध वकील होते, त्यांचे नाव श्रीराममोहन दत्त. त्यांच्या मुलाचे नाव होते दुर्गाचरण. तो सुद्धा नावाजलेला वकील होता. पण त्याचे लक्ष वकिलीत व संसारात नव्हते. त्यांच्या मुलाचे नाव विश्वनाथ होते. विश्वनाथ लहान असतानाच दुर्गाचरण यांनी संन्यास घेतला होता. विश्वनाथची वकीली चांगली चालली होती. त्यामुळे पैसा भरपूर मिळत होता. विश्वनाथ म्हणजेच विवेकानंदाचे वडील.

विवेकची आई होती भुवनेश्वरीदेवी. त्या श्रद्धाळू होत्या. त्यांना बंगाली भाषेचे ज्ञान होते. रामायण, महाभारत, भागवत, याचे त्या वाचन करीत असे. परोपकारी हा त्यांचा चांगला गुण होता. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदर होता.

भुवनेश्वरीदेवींना मुलगा नव्हता, दोन मुली होत्या. मुलगा नसल्याचं दुःख त्यांना होतं. मूल व्हावं म्हणून त्यांनी जपतप केले, अखेर भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले.

१२ जानेवारी १८६३ साली त्यांना एक मुलगा झाला. तो साक्षात महादेवच आहे असे वाटत होते. म्हणून त्या मुलाचे नाव बारेश्वर ठेवले. त्याला सर्वजण लाडाने ‘बिले’ म्हणत.

बिलेच्या अंगात खोडकरपणा खूप होता. त्यामुळे तो आपल्या मोठ्या बहिणींना खूपच त्रास देत असे. तो त्रास द्यायला लागला की त्याची आई शिव शिव म्हणून त्याच्या डोक्यावर पाणी शिंपडत असे. मग बिले एकाएकी शांत होई. मग आई म्हणत असे ‘बघा, प्रत्यक्ष शंकरच माझ्या घरी आले आहेत.’

लहाणपणी बिले खूप गोड दिसायचा. त्याचे मोठे डोळे, धारदार नाक, भव्य कपाळ यामुळे तो खूप तेजस्वी दिसत

असे. सर्वांचा अगदी लाडका होता तो. वीरेश्वराचे नाव नरेंद्रनाथ असे ठेवण्यात आले. भुवनेश्वरीदेवींना पुढे महेंद्रनाथ व भूपेंद्रनाथ अशी दोन मुले झाली.

तल्लख बुध्दीचा नरेंद्र

नरेंद्र खूप हुशार होता. त्याची बुद्धी तल्लख होती. नरेंद्रला गाडीत बसून फिरायला जायला खूप आवडत असे. त्याची आई दररोज त्याला रामायण-महाभारतातील गोष्टी सांगायची. नरेंद्र त्या गोष्टी अगदी मन लावून ऐकून लक्षातही ठेवत असे. त्यामुळे त्याला श्रीरामाविषयी अस्था निर्माण झाली. मग त्याने बाजारातून एक सीतारामाची मूर्ती विकत आणली व तिची नियमाने पूजा करू लागला. नंतर पुढे थोड्या दिवसांनी रामाची मूर्ती जाऊन तिच्या जागी शंकराची मूर्ती आली. त्याही मूर्तीच्या जागी मारूतीची मूर्ती आली. नंतर नरेंद्र मारूतीचा भक्त कायम राहिला.

बालवयातच ध्यानधारणेत मग्न

एक दिवस मुले दत्तांच्या वाड्यात जमली होती. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यात ती मुले दंग झाली होती. इतक्यात रात्रीच्या कीर्तनाची आठवण एका मुलाला झाली. तो म्हणाला, ‘आपणही सर्वजण ध्रुव बाळासारखी तपश्चर्या करूयात!’ त्याचे हे बोलणे सर्वांना आवडले. तात्काळ सगळेजण मांडी घालून बसले आणि डोळे मिटून ध्यान करू लागले.

बराच वेळ सर्वजण शांत बसले होते. तेवढ्यात एका मुलाला सळ् सळ् फुस् फुस् असा आवाज ऐकू आला. तो खूप घाबरला. त्याने डोळे उघडून पाहिले तर समोर भला मोठा साप होता !!

साप पाहून ‘साप ! साप!’ जोरजोराने तो मुलगा ओरडू लागला, त्या मुलाचा आवाज ऐकून सर्वांनी डोळे उघडले. सापाला पाहून आरडाओरडा करत सर्वजण पळू लागले. वडीलमंडळी वर आली. कुणी हातात काठी, कुणी वेताची छडी घेतली होती. ‘अगंबाई! केवढा मोठा आहे हा साप !’ बायका बोलत होत्या. काठ्या घेतलेले लोक पुढे झाले. बघतात तर त्यांना एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. एवढी गडबड चालू असताना एक मुलगा मात्र शांतपणे ध्यानस्थ बसला होता. साप खूपच त्याच्या जवळ गेला होता. त्यामुळे सापाला मारता येईना. ‘आता सापाला कसे मारायचे?’ हा प्रश्न सर्वांना पडला होता.

तो साप एकाएकी निघून गेला व पाहता पाहता दिसेनासा झाला. साप तिथून निघून गेल्यावर लगेचच सर्व मंडळी पुढे आली. त्या मुलाजवळ गेली. त्याला जोराने हलविले तेव्हा त्याने डोळे उघडून पाहिले. लोकांना पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले। ‘हे काय! तुम्ही सर्व इथे का जमलात? आणि या हातात काठ्या कशासाठी?’

तेथे जमलेल्या लोकांपैकी एकजण म्हणाला, ‘अरे मुला, या ठिकाणी मोठा साप आला होता. सर्व मुले पळाली परंतु तू काही जागचा हलला नाहीस, इथे शांत बसून राहिलास. त्यामुळे आम्हाला वाटले सापाने दंश केला की काय तुला?’

त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘साप आलेला मला माहितच नाही, मी वेगळ्याच विश्वात होतो!’ त्या मुलाचे ते बोलणे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. इतक्या लहानवयात समाधी लावून देहभान विसरणारा आणि अपूर्व आनंद लुटणारा हा मुलगा म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून स्वामी विवेकानंदच होय!

नरेंद्र शाळेत जाऊ लागला

नरेंद्रने शाळेत जाण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी त्याला नवनवीन मित्र मिळाले. त्याचा मित्रपरिवार वाढला, नरेंद्र मुलांचा नेताच बनला, इतरांपेक्षा त्याचा स्वभाव खूपच वेगळा होता, तो मित्रांपेक्षा काही वेगळाच दिसत असे. त्याला

भांडणे करायला अजिबात आवडत नसे. उलट तो इतरांची भांडणे सोडवत असे.

धाडसी नरेंद्र

नरेंद्र हा लहानपणापासूनच धाडसी वृत्तीचा होता. त्याला कोणत्याच गोष्टीची भिती वाटत नव्हती. एक दिवस मित्रांबरोबर नरेंद्र जत्रेला गेला. तेव्हा एक मुलगा रस्ता ओलांडत होता. त्यावेळी अचानक एक घोडागाडी वेगाने त्याच्या दिशेने येत होती. त्या मुलाला मागे जाऊ की पुढे जाऊ हे समजेना. तो खूपच गोंधळला. ती घोडागाडी इतकी जोरात होती की कोणाचंही धाडस त्या मुलाला वाचवण्यासाठी होईना. त्या मुलाचे काही खरे नाही हे पाहून नरेंद्रने कसलाही विचार न करता पटकन त्याच्या दिशेने धावत गेला. त्याने झटकन त्या मुलाला आपल्याकडे ओढले म्हणून त्या मुलाचे प्राण वाचले.

नरेंद्राचे हे धाडस पाहून नरेंद्रच्या आईला त्याचे खूपच कौतुक वाटले. तिने त्याला शाब्बासकी दिली व म्हणाली, ‘बाळा असेच नेहमी दुसऱ्यांच्या उपयोगी पडत जा!’

दोन वर्षाचा अभ्यास एकाच वर्षात

नरेंद्र चौदा वर्षांचा असेल तेव्हा त्याला अतिसार होऊन पोटदुखीचा आजार झाला. या आजाराने तो खूपच अशक्त झाला. त्यावेळी त्याचे वडील विश्वनाथ हे रायुपरमध्ये नोकरीला होते. हवापालट झाल्याने नरेंद्राची प्रकृती सुधारेल म्हणून त्यांनी त्याला रायपूरला नेले. रायपूरमध्ये २ वर्षे नरेंद्र राहिला. हळूहळू तो बरा होऊ लागला. पूर्ण बरा झाल्यानंतर वडिलांबरोबर तो पुन्हा कलकत्त्याला आला.

आजारपणामुळे नरेंद्रची दोन वर्षे वाया गेली. रायपूरहून परत आल्यावर आता त्याला कोणत्या वर्गात बसवायचे हा प्रश्न त्याच्या वडिलांपुढे होता. त्यावेळी शाळेचे मुख्य अधिकारी त्यांना म्हणाले, ‘नरेंद्रचा अभ्यास कच्चा राहिला असणार. त्यामुळे तो मॅट्रिकच्या वर्गात बसू शकत नाही.’ हे ऐकून वडिलांना खूपच वाईट वाटले, पण काय करणार धीर सोडून चालणार नव्हते. ते त्या अधिकाऱ्याला परत भेटले. काही शिक्षकांना नरेंद्र हुशार आहे हे माहित होते. विश्वनाथबाबूंनी खूप खटपट करून नरेंद्राला मॅट्रीकच्या वर्गात बसायला परवानगी मिळवून दिली.

नरेंद्राने खूप अभ्यास करून दोन वर्गाचा अभ्यास एका वर्षात पूर्ण केला. शेवटी परीक्षा झाली. नरेंद्राचा निकाल पाहून सर्वजण चकित झाले कारण नरेंद्र चांगल्या माकनि पहिल्या वर्गात पास झाला होता. सर्वांना खूप आनंद झाला. त्याचे तोंडभरून कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापकाने शाब्बासकी दिली.

प्रिन्सिपॉलकडून कौतुक नरेंद्र कॉलेजात जाऊ लागला तेव्हा तो सोळा वर्षाचा होता. कॉलेजमध्ये सर्वांशी मिळून मिसळून रहात होता. दंड-बैठका, कुस्ती, क्रिकेट हे खेळ त्याला खूप आवडत असे. त्यांचा आवाजही खूप चांगला होता त्यामुळे त्याचे मित्र त्याच्याभोवती जमा होत. नरेंद्र स्वभावाने खूप विनोदी होता. त्याच्या संपर्कात जो कोणी येईल तो आनंदीत होई. नरेंद्र अभ्यासात खूप हुशार होता. बाकीच्या मुलांना ज्या अभ्यासाला चार तास लागे तो अभ्यास तो एका तासात
संपवी. एकदा का त्याने अभ्यासाला सुरुवात केली की पानेच्या पाने वाचून तो संपवत असे. गुणी, हुशार नरेंद्र कॉलेजच्या प्रिन्सिपॉलचा अतिशय लाडका होता. एक दिवस नरेंद्रने वादविवाद स्पर्धेत भाषण केले. ते ऐकून प्रिन्सिपॉल म्हणाले, ‘इतका हुशार व कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी मी कुठेच पाहिला नाही!’

परमेश्वराचा ध्यास

नरेंद्र कॉलेजच्या पहिल्या वर्गात असताना खूप आजारी पडला. त्यामुळे त्याला परीक्षा देता आली नाही. हे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्याने खूप वाचन केले. ‘हे जग कोणी निर्माण केले? तो कोठे आहे? कसा आहे…..? वगैरे विषयांवर त्याने पुष्कळ पुस्तके वाचली.

नरेंद्रला कोणतीही गोष्ट आवडली की तो सतत तिच्याचमागे लागायचा. नरेंद्राला आता ईश्वरदर्शनाचा ध्यास लागला होता. त्याला जी कोणी थोर मंडळी भेटत त्यांना तो एकच प्रश्न विचारत असे, ‘महाराज, आपल्याला परमेश्वराचे दर्शन झाले आहे काय?’

सर्वांकडून त्याला ‘नाही’ हेच उत्तर मिळाले. त्यामुळे नरेंद्र बेचैन होत होता. ही एक गोष्ट माहित करून घेण्यासाठी तो बेचैन झाला होता. त्याला झोप येईना की भूक लागेना. ‘काहीही झाले तरी सत्याचा शोध लावीनच!’ महर्षि देवेंद्रनाथ ठाकुरांनाही त्याने परमेश्वर भेटला का? हा प्रश्न विचारला परंतु त्याची निराशाच झाली. परंतु ईश्वरभेटीचे वेड त्याला लागलेलेच होते.

लग्नाचा विचार सोडला

आता नरेंद्र छोट्या घरात म्हणजे त्याच्या आजीच्या अगदीच लहान असलेल्या घरात राहू लागला. तिच्या घरी जास्त माणसे नव्हती. तेथे एका लहानशा खोलीत नरेंद्र राहू लागला. रात्रंदिवस ईश्वराविषयक पुस्तके वाचू लागला. ध्यान, प्राणायाम करू लागला. एकांतात अधिक वेळ घालू लागला. साधे कपडे वापरू लागला. चटईवरच झोपू लागला. त्याचे हे वर्तन पाहून तो जवळजवळ संन्यासीच वाटत होता.

नरेंद्रच्या आईला सूनबाई घरी आणण्याची घाई झाली होती. वडिलांनाही आपल्या मुलाने लग्न करून संसार करावा असे वाटत होते व त्याने वकिली करावी म्हणून तसे शिक्षणही देणे सुरू केले होते. परंतु नरेंद्राचा लग्न करण्याचा अजिबात विचार नव्हता. घरातल्या लोकांना नरेंद्राला कसे समजून सांगावे हे कळेना. शेवटी त्यांनी आपल्या एका नातेवाईकाला नरेंद्राला समजून सांगण्यासाठी सांगितले. त्यांचं नाव हो नाव होते डॉक्टर रामचंद्र दत्त. नरेंद्र त्यांना खूप मान देई. एक दिवस नरेंद्राला भेटून डॉ. रामचंद्रने विचारले ‘नरेंद्र तुझे लग्न करण्याचा विचार आहे की नाही, चांगली स्थळे तू का नाकारतोस ?”

त्यावर नरेंद्र म्हणाला, ‘डॉक्टरबाबू, मला लग्न वगैरे काही करायचे नाही! मला तपश्चर्या करावीशी वाटते. ध्यान करावेसे वाटते. परमेश्वराला भेटायची तीव्र इच्छा आहे. भेटेल का हो मला ईश्वर?’

रामचंद्रबाबू त्याला म्हणाले, ‘तुझे ध्येय खूप महान आहे पण कठीणही तेवढेच आहे. ईश्वर तुला यश देवो. मग तू आता इकडे तिकडे न भटकता सरळ दक्षिणेश्वरी जा, तिथे तुला परमहंस भेटतील. त्यांचं नाव रामकृष्णदेव. तेच तुला ईश्वर कसा भेटेल याचा मार्ग सांगतील.

Leave a Comment