पुण्यातील बाणेर-पाषाण रोडवर एका डिजिटल कंटेन्ट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
महिला तिच्या दोन मुलांसह चालली असताना, हल्ला करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने त्यांना जाण्यासाठी जागा दिली आणि गाडीदेखील बाजूला केली, पण तरीही कार चालवणाऱ्या व्यक्तीने गाडी थांबवून महिलेला मारहाण केली. या महिलेचा दोन किमीपर्यंत पाठलाग करून तिला मारहाण करण्यात आली. यामध्ये तिच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहत असल्याचं तिच्या एका व्हिडिओतून समोर आलं आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस तपास करत आहेत.
पुण्यातील बाणेर-पाषाण रोडवर एका डिजिटल कंटेन्ट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेचा दोन किमीपर्यंत पाठलाग करुन तिला मारहाण करण्यात आली. यामध्ये तिच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याचं तिच्याच व्हिडिओतून समोर आलं आहे. आपल्यावर ओढवलेल्या या बिकट प्रसंगाची माहिती तीनं या व्हिडिओतून दिली आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस तपास करत आहेत. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.
जेरलिन डिसिल्वा असं या महिलेचं नाव आहे. इन्स्टाग्रामवर या महिलेचे 70,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. बाणेर-पाषाण लिंक रोडवरुन दोन लहान मुलांना घेऊन बाईकवर चाललेली असताना ही घटना घडली आहे. एका कार चालकानं तिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, यावेळी जेरलिन यांना तिची दुचाकी बाजूला घेण्यास सांगितलं. यावेळी आरोपी ड्रायव्हरनं आपली कार थांबवली आणि खाली उतरुन त्यानं जेरिन यांच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा दिल्यानं तिच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. जेरिनसोबत असलेल्या दोन लहान मुलांसमोर या अज्ञात कारचालकानं तिला मारहाण केली तसेच तिचे केसही ओढले.
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Attack On Digital Content Creator Lady | पुण्यातील बाणेर-पाषाण रस्त्यावर (Baner Pashan Link Road) एका डिजिटल कंटेन्ट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण (Marhan) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेचा दोन किमीपर्यंत पाठलाग करुन तिला मारहाण करण्यात आली. आपल्यावर ओढवलेल्या या बिकट प्रसंगाची माहिती त्या महिलेने व्हिडिओतून दिली आहे. ज्यामध्ये तिच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहत असल्याचं समोर आलं आहे. जेरलिन डिसिल्वा असं या महिलेचं नाव आहे.
Baner Pashan Road Pune | पुणे बाणेर-पाषाण रोडवर दोन मुलांसह आईवर दुचाकीस्वाराकडून हल्ला
पुण्यातील डिजिटल कंटेंट क्रिएटर जेरीलन डिसिल्वा यांच्यावर आज बाणेर-पाषाण लिंक रोडवर गाडी चालवत असताना हिंसक हल्ला करण्यात आला. एका वाहनचालकाने तिच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा हल्ला झाला. मोटारचालकाला जाऊ देण्याच्या प्रयत्नात, जेरीलन रस्त्याच्या कडेला गेली, परंतु ड्रायव्हरने त्याचे वाहन थांबवले, तिच्याशी सामना केला आणि तिच्या चेहऱ्यावर प्रहार केला, ज्यामुळे गंभीर रक्तस्त्राव झाला.
जेरिलनने नोंदवले की मोटारचालक, ज्याचे वर्णन वृद्ध व्यक्ती म्हणून केले गेले आहे, तो बेपर्वाईने वेगवान होता आणि इतर रस्ता वापरकर्त्यांना धोक्यात आणत होता. घटनेच्या वेळी जेरलिन तिच्या दोन लहान मुलांसह दुचाकीवरून जात होती. तिने एका इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये तिचा त्रासदायक अनुभव दस्तऐवजीकरण केला आहे, पुण्यातील महिला आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबद्दल तिची चिंता व्यक्त केली आहे. हल्लेखोराने तिचे केस ओढल्याचेही तिने व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.