२०२३ मध्ये शाहरूख खानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. वर्षाच्या सुरुवातीला ‘पठाण’ आला, ज्याने जगभरात १००० कोटी कमावले. त्यानंतर ‘जवान’ आला, याने ‘पठाण’पेक्षाही जास्त कमाई केली. ‘जवान’ ने ११४८.३२ कोटींची कमाई केली. यावर्षी जगभरात एवढी कमाई कुणी करू शकले नव्हते. २०२४ वर्षातील ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट ‘कल्कि : २८९८ एडी’ने जगभरात ११०० कोटींची कमाई केली. तरीदेखील प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांच्या या चित्रपटाने ‘जवान’ला कमाईच्या बाबतीत मागे सोडले.
• खरंतर, ‘कल्की : २८९८ एडी’ने देशात कमाईच्या बाबतीत ‘जवान’ला मागे सोडले आहे. ‘जवान’ अजूनही : जगभरात कमाईच्या बाबतीत पुढेच आहे. नाग आश्विन दिग्दर्शनाखाली बनलेला प्रभासचा चित्रपट जगभरात हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषांसह विविध भाषांत २७ जूनला रिलीज झाला.
• पहिल्या दिवशी जगभरात १७५ कोटींची कमाई केली आणि रिलीजच्या ४० दिवसांनंतर एक नवा रेकॉर्ड बनवला. देशातील सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘जवान’ला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहोचलेला चित्रपट बनला.
■ ‘कल्की २८९८ एडी’ने देशाच्या बॉक्स ऑफिसवर ६४०.३० कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
• ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर ६४०.२५ कोटी कमावले. जगभरात कमाईच्या यादीत हा चित्रपट ‘जवान’पेक्षा ४८ कोटी रुपयांनी मागे आहे.
■ हे आहेत देशातील सर्वांत जास्त कमाई करणारे चित्रपट.
1) बाहुबली २ = १०३०.४२ कोटी
2) केजीएफ २ = ८५९.७ कोटी
3) आरआरआर = ७८२.२ कोटी
4) कल्की = ६४०.३० कोटी
5) जवान = ६४०.२५ कोटी
कल्किचे एका आठवड्याचे कलेक्शन
‘बाहुबली 2’ नंतर नाग अश्विन दिग्दर्शित कल्की हा प्रभासच्या करिअरमधील दुसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. पहिल्या दिवशी, चित्रपटाने सर्व भाषांमध्ये एकूण 98 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर जगभरात याने 191 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 65 कोटींची कमाई केली.
तिसऱ्या दिवशी 75 कोटी 77 लाखांची कमाई केली. त्याच वेळी, पहिल्या वीकेंडला म्हणजेच चौथ्या दिवशी चित्रपटाने 90 कोटी 65 लाख रुपयांचा गल्ला जमवला. अशा प्रकारे, चार दिवसांच्या ओपनिंग वीकेंडमध्ये चित्रपटाचे एकूण कलेक्शन 324 कोटी 15 लाख रुपयांवर पोहोचले होते, तर जगभरातील त्याचे कलेक्शन 555 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
कल्कीने पहिल्याच आठवड्यात फायटरला मागे टाकले
‘कल्की’ हिंदीने भारतात पहिल्याच आठवड्यात 162.80 कोटी रुपये कमवले. असे असताना या चित्रपटाने ‘फायटर’च्या पहिल्या आठवड्यातील व्यवसायाला मागे सोडले. फायटरने पहिल्या आठवड्यात 146.50 कोटी रुपये कमावले होते.